मुंबई दि.१९ – आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा व्यवहारात असणार आहेत. सध्या तरी नोटा चलनात सुरु असतील. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे.