Site icon सक्रिय न्यूज

केज – बीड रोडवर बस दुचाकीचा अपघात…..!

केज दि.२० – आज पुन्हा एक केज बीड रोडवर अपघात झाला असून एसटी बस आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.(st bus motarcycle accident on kaij beed rod near massajog, 60 years biker injured)

           मस्साजोग जवळील उत्तरेश्वर पिंपरी फाट्यावर सदरील अपघात झाला. यामध्ये कळंब तालुक्यातील देव धानोरा येथील पांडुरंग बोंदर (60) हे शनिवारी दुपारी सांगवी सारणी येथून मुलीला भेटून दुचाकीने केज कडे निघाले होते.
               दरम्यान पाठीमागून आलेल्या पुणे नांदेड (pune -nanded) गाडीचा आणि दुचाकीचा अपघात झाला (bus bike dashed) आणि यामध्ये पांडुरंग बोंदर हे गंभीर जखमी झाले आहेत. पांडुरंग बोंदर यांना तात्काळ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
शेअर करा
Exit mobile version