Site icon सक्रिय न्यूज

दिव्यांगानी मोफत पुर्व तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा – धनंजय घोळवे….! 

केज दि.२३ – बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यात तालुका निहाय मोफत दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले आहे.या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने आणि उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
             केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  मंगळवारी बीड येथे जिल्हा रुग्णालयात या तपासणी शिबिराचा उदघाटन समारंभ संपन्न होणार असून बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन पार पडणार आहे.
                सदरील शिबीराचा शुभारंभ 23 मे रोजी बीड येथे तर समारोप 02 जून रोजी परळी इथे संपन्न होणार आहे. यामध्ये केज बुधवार दि.24-05-23 माजलगाव  गुरुवार दि.25-05-23 गेवराई शुक्रवार  दि.26-05-23 वडवणी शनिवार  दि.27-05-23 धारुर रविवार  दि.28-05-23 अंबाजोगाई सोमवार  दि.29-05-23 आष्टी मंगळवार दि.30-05-23 शिरुर (का) बुधवार  31-05-23 पाटोदा गुरुवार दि.01-06-23 व परळी शुक्रवार  दि.02-06-23 रोजी शासकीय रुग्णालयात तपासणी होणार आहे.
दिव्यांग तपासणी शिबिरात केवळ नोंदणी आणि तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांगानी घ्यावा असे आवाहन भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धनंजय घोळवे यांनी केले आहे .
शेअर करा
Exit mobile version