केज दि.२५ – फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये औरंगाबाद विभागाचा 91.85% तर यामध्ये केज तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के लागला आहे
कोरोना नंतर सर्व नियम व अटीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी मार्च 2023 बारावी परीक्षेमध्ये केज तालुक्यातून एकूण 4569 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते यामध्ये 1245 विद्यार्थी े विशेष प्राविण्यामध्ये उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीमध्ये 2268 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये 779 विद्यार्थी तर 85 विद्यार्थी हे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत असे एकूण 4374 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केज तालुक्याचा एकूण निकाल ९५.७३ टक्के लागला आहे तर केज तालुक्यातील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 311 विद्यार्थ्यांपैकी 182 विद्यार्थी विशेष प्राविण्यामध्ये, 104 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 16 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये असे एकूण 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे.
संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, प्राचार्य पी.एच.लोमटे तसेच शिक्षवृन्दानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, फिजिक्स पेपरमध्ये अक्षर बदल झाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांची तसेच केंद्र प्रमुखांचीही चौकशी करण्यात आली होती.तर तालुक्यातील 4569 विद्यार्थ्यांपैकी 195 विद्यार्थी अनुतीर्ण झाले असून त्यांना येणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.