बीड, दि. 30 – भाजपा नेते मंत्री अतुल सावे यांची पालकमंत्रीपदी निवड झाली हे अनेकांना रुचले नसल्याने त्यांना सुरुवातीपासून विरोध होत आहे. हा विरोध जाणीवपूर्वक ठरवून केला जात असून जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी देवूनही काही नेते बिनबुडाचा आरोप करत आहेत. मात्र जर काही राजकीय संधीसाधू माणसं, आमच्या समाजाच्या नेत्याला जाणीवपुर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतील, तर समाज तुमच्या मतदार संघात कोणाला समर्थन द्यायचे की नाही ? याचा विचार करेल. असा इशारा महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ऍड. सतीश शिंदे यांनी दिला आहे.
ऍड. सतीश शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासुन विशिष्ट समाजाची मक्तेदारी आहे. त्यांना इतर समाजाचा माणूस मोठ्या पदावर चालत नाही. आम्ही म्हणेल तेच त्यांनी ऐकले पाहिजे, अशी वृत्ती जोपासली जात आहे. त्यामुळे ना. अतुल सावे हे बीडचे पालकमंत्री झाल्यापासून, त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने टार्गेट केले जात आहे.
दरम्यान, विनाकारण ना. अतुल सावेंना टार्गेट केले तर तुमच्या मतदारसंघात समाज तुम्हाला समर्थन द्यायचे का नाही ? याचा विचार करेल. त्याचबरोबर महात्मा फुले युवा दल तुम्हाला तुमची जागा दाखवेल. असा इशारा देखील यावेळी ऍड. सतीश शिंदे यांनी दिला आहे.