केज दि.३१ – तालुक्यातील साबला येथे ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” २०२३ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सरपंच जनाबाई नरहरी काकडे या होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे, सिंधूताई महादेव कटारे, प्रतिभा पोपट काकडे, सुनंता अशोक काकडे, वर्षा सदाशिव काकडे आशा वर्कर या उपस्थित होत्या .
यावेळी महानंदा प्रकाश नाईकनवरे व गंगा जालींदर मुळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुररकार प्राप्त महिलांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदरील या कार्यक्रमासाठी गावातील अनिता रामराजे शिंद, मंगल जालींदर काकडे, रविना विजयकुमार शिंदे, पुजा ज्ञानेश्वर पांचाळ, रूपाली हनुमंत परळकर, काशिबाई अभिमान राऊत, सारिका विजय सरवदे, कान्होपात्रा आण्णासाहेब मस्के, श्रीमती बिबिनंदा डोंगरे, कमल संदिपान सरवदे, मुक्ता अशोक पांचाळ इत्यादी महिला उपस्थित होत्या. तसेच उमांशकर शिंदे, सदाशिव काकडे, अशोक काकडे, पोपट काकडे, ज्ञानेश्वर पांचाळ, लखन राऊत, राहूल मुळे, जालींदर मुळे, लखन कटारे इत्यादी पुरुष मंडळीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी केले तर आभार लक्ष्मण काकडे यांनी मानले. .