Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील तरुण हॉटेल चालकाचा मृतदेह आढळला…..!

केज दि.१ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी नितीन खाडे या तरुण हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह स्वतःच्या हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

                 तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी नितीन शहाजी खाडे यांनी केज शहरांमध्ये हॉटेलच्या माध्यमातून व्यवसायामध्ये चांगले नाव कमावले होते. आणि गावच्या राजकीय क्षेत्रात ही ते कार्यरत होते. मात्र बीड रोडवरील शिवशाही हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.                                                               सदरील घटना ही कोणत्या कारणातून घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version