Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल….!

केज दि. 3 जून – चुलत भावाने अल्पवयीन चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. abducted Minor sister abducted by cousin; A case has been registered in the police.
              धारूर Dharur तालुक्यातील एका गावातील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली एक साडे सतरा वर्ष वयाची मुलगी युसुफवडगाव ( ता. केज) पोलीस Police ठाण्याच्या हद्दीत मामाच्या गावी आजोळी आली होती. दि. 31 मे रोजी मुलगी घरी आढळून आली नाही. याची माहिती मामाने मुलीच्या आई- वडिलांना फोनवरून दिली. तसेच मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. 2) युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मुलीला त्यांच्या पुतण्याने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची तक्रार दिली. abducted.. Minor sister abducted by cousin; A case has been registered in the police
            दरम्यान, चुलत भावानेच चुलत बहिणीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे चार महिन्यापूर्वी याच  चुलत भावाने पळवून नेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धारुर Dharur पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शेअर करा
Exit mobile version