अंबाजोगाई दि.८ – श्री तिरुपती शिक्षण संस्था संचलित श्री व्यंकटेश विद्या मंदिर येथे परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब जाधव पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे संचालक राहुल सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा अध्यक्ष किरण पाटील, गंगा माऊली शुगर चे चेअरमन हनुमंत मोरे, संस्थेचे कोषाध्यक्ष राजेश पाटील, संचालक भूषण पाटील, रुद्र जाधव हे होते.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब जाधव पाटील यांनी असे सांगितले की, राष्ट्राचे भवितव्य उज्वल बनवण्यासाठी गुणवंत विद्यार्थी घडवणे गरजेचे आहे. मला खूप अभिमान आहे आमच्या शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा गेली दहा वर्षापासून कायम आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले.तर परभणी कृषी विद्यापीठाचे संचालक राहुल सोनवणे यांनी असे सांगितले की, संस्थेचे संस्थापक बप्पासाहेब जाधव पाटील, संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, कोषाध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा खूप मोठ्या उंचीवर गेलेली आहे. शिस्त व प्रेम या दोन्हीची सांगड घालणारी म्हणजे श्री तिरुपती शिक्षण संस्था होय.
अध्यक्षीय समारोप करताना माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी असे सांगितले की, अंबाजोगाई शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. या माहेरघरात गेल्या दहा वर्षापासून शहरात प्रथम येण्याचा मान या शाळेने जो दाखवला तो खूप अभिमानास्पद आहे. अतिशय शिस्तबद्ध शाळा म्हणजे श्री व्यंकटेश विद्या मंदिर आहे ज्या पद्धतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब जाधव पाटील यांनी जी मेहनत घेतली, त्यामुळे ही संस्था महाराष्ट्रात आदर्श संस्था आहे. विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घ्यावे. त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्यामध्ये आपले करिअर निवड, शिक्षण घेण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती आर. ए. पवार तर आभार श्रीमती एस. बी. कोकाटे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.