अंबाजोगाई दि.९ – आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून आडसहुन अंबाजोगाईला येत असताना चनई जवळ कार झाडाला आदळून अपघात झाला या अपघातात दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय ३९) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय ३८) अंबाजोगाई असं यांचा मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. हा अपघात आज शुक्रवार (दि.०९) दुपारी १२ वाजता झाला आहे.
डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. आडस येथील आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून कारमधून (एमएच ४४ एस ३९८३) अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडकुन हा अपघात झाला. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे.