Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील दोन तरुणांचे अकाली निधन…..!

 केज दि.१० – तालुक्यातील दोन तरुणांचे वेगवेगळ्या घटनेत अकाली निधन झाल्याने कुटुंबियांसह  युसूफवडगांव आणि नांदूर घाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
                    युसुफ वडगाव येथील ओम शिवाजी खरबड वय(२९) या तरूणाचे दि.८ जुन रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास प्रदिर्घ आजाराने निधन झाले. अतिशय शांत आणि मनमिळाऊ स्वभाचा असणारा ओम गेल्या काही दिवसांपासुन आजारी होता.त्याच्यावर मुंबई, पुणे व बार्शी येथील दवाखान्यात उपचार करण्यात आले होते पण त्याच्या तब्येतीत काही केल्या सुधारणा होत नव्हती.शरीर उपचारांना साथ देत नसल्याने त्यांची शरीर प्रकृती फारच खालवली होती.त्यामुळे त्याचे घरीच उपचार सुरू होते.मात्र  काल रात्री त्यांची तब्बेत अचानक खालवली आणि त्यातच त्यांचे रात्री ११:३० वाजेच्या सुमारास निधन झाले.तिशीतील तरूणाचे असे आजारपणाने ऐन तारुण्यात जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.सर्वांच्या मदतीला धावुन जाणारा अशी ओळख असलेला ओम अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह मित्र परिवारातील सर्वांना धक्का बसला आहे.त्याच्या पश्चात आई-वडील,भाऊ,पत्नी दोन लहान मुली असा परिवार आहे.ओम खरबडला शेवटचा निरोप देण्यासाठी नातेवाईक,मित्र परिवार व गावकरी उपस्थित होते.
               तर अन्य एका घटनेत अहमदनगर येथील विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर करंजी घाटात आज पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ट्रकचा ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात केज तालुक्यातील नांदूरघाट येथील रहिवासी शैलेश लोंढे या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. 

नगरहून बीडकडे रासायनिक खत घेऊन हा ट्रक येत होता. पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास करंजी घाटादरम्यान माणिक शहा दर्ग्याजवळ असलेल्या वळणावर ताबा सुटला आणि ट्रक 25 फूट खोल दरीत जाऊन कोसळला आहे. यात केज तालुक्यातील नांदूरघाट  येथील रहिवासी शैलेश लोंढे (वय-३३) या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा साथीदार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शेअर करा
Exit mobile version