Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात सहा कंटेन्मेंट झोन प्रस्तावित

केज दि. 4 – सोमवारी केज तालुक्यात पुन्हा सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे दिवसेंदिवस तालुक्यातील रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.  सोमवारी आलेल्या अहवालात शहरातील तीन व ग्रामीण भागातील तीन असे सहा रुग्ण वाढल्याने तालुक्यातील ढाकेफळ, गांजी, आरणगाव या गावांत तर शहरातील आनंद नगर, माधवनगर तसेच समर्थ मठ परिसरात कंटेन्मेंट झोन लागू करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली.                    दरम्यान आनंदनगर मध्ये मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळून आल्यानंतर सदरील भाग सील करण्यात आला होता व त्याची मुदत संपल्याने कालच त्या भागात शिथिलता देण्यात आली होती. मात्र पुन्हा त्याच भागात एक रुग्ण आढळल्याने दुसऱ्याच दिवशी तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची वेळ आली आहे.
      तर आज सकाळी तालुक्यातून 59 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. रात्री उशिरापर्यंत अहवाल येण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात आजपर्यंत 36 रुग्ण आढळून आले असून यामध्ये ग्रामीण भागातील 28, शहरातील 8 रुग्णांचा समावेश आहे. तर 36 पैकी 23 रुग्ण बरे झाले असून 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शेअर करा
Exit mobile version