Site icon सक्रिय न्यूज

मान्सून संदर्भात हवामान खात्याने केली अधिकृत घोषणा…..!

बीड दि.११ – गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो मान्सून monsoon आला आहे. राज्यात मान्सून आल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून आला होता, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे आता शेतकरी farmer बांधवानी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे, परंतु पुरेसा पाऊस rain झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे.
                राज्यात कोकणात पाऊस सुरु झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत होता.पुढचे दोन दिवस चक्रीवादळाचे परिणाम कोकण konkan किनारपट्टीवर जाणवणार आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा Imd इशारा दिला होता. किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किलोमिटरने वारे वाहण्याची शक्यता आहे.
             दरम्यान, कोकणात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसाच्या सरी होत होत्या. परंतु आता मान्सून दाखल झाला आहे. ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.
शेअर करा
Exit mobile version