Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यानेही कमावले यूपीएससी परीक्षेत नाव……!

केज : तालुक्यातील आडस येथील नेहा किर्दक ही मंगळवार (दि.०४) रोजी जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशातून ३८३ रँक मिळवत उत्तीर्ण झाली आहे. ती आडसची पहिली युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होणारी कन्या ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
तालुक्यातील आडस येथील नेहा लक्ष्मण किर्दक हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण औरंगाबाद शहरातील शारदा विद्यामंदिर कन्या प्रशाला तर महाविद्यालयीन शिक्षण देवगीरी महाविद्यालयात झाले. शिक्षणात सतत विशेष गुणाने उत्तीर्ण होत असलेल्या नेहाचे एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण शासकीय घाटी रुग्णालयात झाले. वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच तिने यावरती समाधान न मानता युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. वडिलांनी अभ्यासाची तयारी करून घेण्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग बंद करून मुलीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले.
आई-वडिलांचे व गुरूजनांचे मार्गदर्शन न स्वत: तिने ध्येय समोर ठेवून केलेला सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे सन-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या निकाल ३८३ वा रँक मिळवत यश संपादन केले आहे. वडीलांचे अधिकारी होण्याचे अधूरे राहिलेले स्वप्न मी पुर्ण केल्याचा अधिक आनंद होत असल्याचे नेहा बोलताना सांगितले.

शेअर करा
Exit mobile version