Site icon सक्रिय न्यूज

भीम सैनिकांच्या घोषणांनी केज शहर दणाणले…..!

केज दि.12 – गायरान धारक भूमिहीन यांच्या हक्कासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी रिपाइं (आठवले) च्या वतीने केज तहसील कार्यालयावर आज भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला.

                    या संघर्ष मोर्चात केज तालुक्यातील गायरानधारक आणि रिपाइंचे  कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिपाइंचे केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला मोर्चा केज तहसिल समोर आल्यानंतर जिल्हाभरातील रिपाइंच्या नेते व कार्यकर्त्यांनी मोर्चे करांना संबोधित केले.
                      यावेळी अक्षय भालेराव, गिरीधर तपवाले यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली.त्याच बरोबर गायरान धारकांना त्यांचे हक्क बहाल करण्याच्याही घोषणा देण्यात आल्या.
शेअर करा
Exit mobile version