राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची 2 डी इको 2D Echo तपासणी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दिनकर राऊत pediatric यांच्या योगिता बाल रुग्णालयामध्ये (वकिलवाडी, केज) मोफत करण्यात येणार आहे.सदरील तपासणी लातूरचे तज्ञ डॉक्टर नितीन येळीकर (एम.डी. कार्डीओलॉजिस्ट) cardiologist हे करणार आहेत.आणि या शिबिरात ज्या रुग्णांमध्ये कांही दोष आढळून येतील त्यांच्यावर मोफत free of cost उपचार करणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज, ग्रामीण रुग्णालय धारूर, माजलगाव व चिंचवण यांनाही सूचित करण्यात आलेले आहे की आपल्या अधिनस्त सर्व वैद्यकीय पथकांना सदरील शिबिराच्या ठिकाणी लाभार्थ्यांना घेऊन जाण्याच्या आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. तर नोडल अधिकारी (आरबीएसके) उपजिल्हा रुग्णालय केज ग्रामीण रुग्णालय धारूर, माजलगाव व चिंचवण यांनाही सूचित करण्यात आलेले आहे की, सर्व वैद्यकीय पथकांना वरील शिबिराच्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना घेऊन यावे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सदर शिबिर स्थळी उपस्थित राहावे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत केज शहरात मोफत 2डी इको तपासणी शिबीर…..!
केज दि.१२ – बालके ही उद्याचे भविष्य आहेत. बालकांचे स्वास्थ्य जर निरोगी असेल तर देशाचे भवितव्य उज्वल होते. आणि म्हणून बालकांना children सुदृढ ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्यांची वाढ निकोप आणि निरोगी होण्यासाठी शासनाच्या state govt वतीने विविध उपाययोजना राबवल्या जातात, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिल्या जाते आणि विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची health काळजी घेतल्या जाते. आणि याचाच भाग म्हणून केज शहरातील योगिता बाल रुग्णालयामध्ये दि.१४ जून रोजी मोफत 2 डी इको (2D Echo) तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत घेण्यात येत असलेल्या शिबिराचा जास्तीतजास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक civil surgeon डॉ.सुरेश साबळे, बालरोगतज्ज्ञ डॉ.दिनकर राऊत यांनी केले आहे.