देशातील काही भागात पावसाच्या Rain सरी पडत आहेत, तर काही भागात उन्हामुळे अंगाची लाही-लाही होताना पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे cyclone गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील बहुतांश भागात पावसामुळे आल्हाददायक वातावरण atmosphere पाहायला मिळत आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. India weather update
उत्तर आणि पूर्व भारतात मात्र नागरिकांना उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. गुजरातला बिपरजॉय biporjoy चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर जोरदार पाऊस heavy rain सुरु आहे. दरम्यान, हा पाऊस अधून-मधून उसंत घेतानाही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे Rajasthan राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. मुंबईसह Mumbai महाराष्ट्रात अनेक भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात marathwada उन्हाचा तडाखा कायम आहे.
सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली, हरियाणासह अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे, त्यामुळे तापमानात temperature घट झाली आहे. भारतीय हवामान Imd खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार forecast दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. तर, महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे. आज मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.