Site icon सक्रिय न्यूज

बीड येथे एक लाख पोस्ट कार्ड मोहीम व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा….!

बीड दि.२० – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा बीड च्या वतीने ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणाऱ्या एक लाख पोस्ट कार्ड मोहिमेचा शुभारंभ तसेच इयत्ता दहावी व बारावी ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ऍड. सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे संपन्न होणार आहे. तरी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र ऍड. सुभाष राऊत यांनी केले आहे.

                बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दिनांक 25 जून 2023 रोजी सकाळी साडे अकरा वाजता ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणाऱ्या एक लाख पोस्ट कार्ड मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजातील इयत्ता दहावी व बारावी वर्गातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ही यावेळी आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक हरी नरके (ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक) हे असणार आहेत. तर यावेळी अखिल भारतीय समता परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रसिद्ध इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ. सतीश साळुंके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष (पूर्व) मकरंद सावे त्याचबरोबर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष (पश्चिम)  आबासाहेब खोत यांचीही उपस्थिती राहणार आहे
              यांच्यासह इतरही मान्यवरही मोठ्या प्रमाणावर सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून समता सैनिकांनी तसेच विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन ऍड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version