Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्रातील ”या” दहा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे…..!

मुंबई दि.२१ – maharashtra rain update  महाराष्ट्रात कडक्याचं ऊन पडतंय. पाऊस कधी सुरु होणार? हा प्रश्न प्रत्येकाला सतावतोय. महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहून अक्षरश: हैराण झालाय. शेतकऱ्यांच्या नजरा सातत्याने आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाला उशिर झाल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. शेतीची अनेक कामं रखडली आहेत. विशेष म्हणजे जून महिन्याची 20 तारीख उजाडली तरी राज्यातील जनतेला तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक सुरु झालीय. काही जणांकडून तर दुष्काळ पडू नये, यासाठी देवाकडे साकडं देखील घातलं जात आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान हवामान विभागाकडून Imd दिलासादायक माहिती समोर आली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला उशिर झालाय. अनेक भागांमध्ये कडाक्याचं ऊन पडतंय. पण राज्यात लवकरच पावसाचं आगमन होणार आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट heat wave असण्याची शक्यता आहे. पण ती लाट ओसरुन तिथे लवकरच पाऊस पडेल. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार heavy rain पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना, तसेच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
                हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होणार आहे. विदर्भात उद्याच्या दिवशी कोरडे हवामान राहील, असं सांगण्यात आलं आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात marathwada पुढच्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये 22 आणि 23 तारखेला पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच 25 जूननंतर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. पुढच्या 72 तासांत म्हणजेच तीन दिवसात मान्सून monsoon हा मुंबई आणि पुणे शहरात दाखल झालेला असेल. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या तीन दिवसांत मान्सून हा मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये पोहोचलेला असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या शुक्रवार पासून म्हणजेच 23 जूनपासून मान्सून येण्याची शक्यता आहे. उद्यापासून 23 जूनपर्यंत पाऊस आपला जोर वाढवण्याची शक्यता आहे. यावर्षी 11 जूनला मान्सून कोकणात दाखल झाला. त्यामुळे तो 15 जूनपर्यंत राज्यभरात दाखल होणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही. राज्यभरात कडाक्याचं ऊन पडलं आणि पावसाला विलंब झाला. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पण आता लवकरत राज्यात पाऊस पडण्याची चिन्हं आहेत
             दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये बुधवारी (21 जून) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतील.
शेअर करा
Exit mobile version