केज दि.२२ – तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करत नवोदय साठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयाचा ईश्वर वसंत केदार हा विद्यार्थी नवोदय परीक्षेत बसला होता. सदरील विद्यार्थ्यांने नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करत नवोदय साठी स्वतःला सिद्ध केले आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राहुल सोनवणे मुख्याध्यापक पी.एच. लोमटे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयात विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धा परीक्षेसाठी प्रविष्ट करून त्यांची परिपूर्ण तयारी करून घेत येत असल्याने दरवर्षी अनेक विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत.