Site icon सक्रिय न्यूज

बीड पोलीस दलातील योध्यास वीरमरण

केज दि.5 – बीड पोलीस दलातील पोलीस नाईक शंकर चिंतामण कळसाने ( 36) रा. बीड, नेमणूक आष्टी पोलीस ठाणे हे कोरोना विषाणू विरुध्दच्या युध्दात लढतांना त्यांना कोरोना या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याने उपचारा दरम्यान विरमरण आले.
       पोलीस नाईक शंकर चिंतामण कळसाने यांचे वडील चिंतामण सखाराम कळसाने हे पोलीस सेवत जमादार म्हणून असतांना त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र शंकर चिंतामण कळसाने हे अनुकंपा तत्चावर 6 डिसेंबर 2006 पोलीस दलात रुजु झाले. त्यांनी पोलीस प्रशिक्षण विद्यालय  नागपूर येथे पोलीस दलाचे मुलभूत प्रशिक्षण पूर्ण करून ते  बीड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यावर रूजू झाले. 2006 ते 2009 तीन वर्ष पोलीस मुख्यालय बीड येथे कर्तव्य बजावले. पुढे 2009 ते 2014 साली परळी ग्रामीण या पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावले. त्या दरम्यान त्यांना 11-11-2013 रोजी पोलीस नाईक म्हणून पदोन्नती मिळाली. पुढे 2015 ते 03-08-2020 रोजी पर्यंत आष्टी पोलीस ठाणे या ठिकाणी सेवा केली. त्यांनी त्यांच्या सेवे दरम्यान वेळोवेळी उत्कृष्ट कर्तव्य बजावलेले आहेत.त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील अट्टल फरार आरोपी गणेश काळे यास त्यांनी शिताफीने पकडले होते. तसेच सन 2018 मध्ये आष्टी येथे नेमणुकीस असतांना त्यांनी दरोडा टाकण्यास सज्ज असणारे आरोपितांना मुद्देमालासह शिताफीने पकडून गुन्हा दाखल केला होता. अशा उल्लेखनिय कर्तव्यासाठी त्यांना 7 बक्षिसे पोलीस दलाकडून देण्यात आली होती.
       दरम्यान आष्टी येथे नेमणूकीस असतांना दि.14-07-2020 रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याने सरकारी दवाखाना बीड येथे उपचार घेत असतांना दि.03-08-2020 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या बीड पोलीस दलातील शहीद कोरोना योध्द्यास बीड पोलीस परिवाराच्या वतीने आज दि. 04-08-2020 रोजी सायंकाळी 0ल5 वा. शोक सलामी देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी श्रध्दांजलीपर शोकभावना व्यक्त करतांना ” या कोरोनाच्या युध्दात बीड पोलीस परिवाराचा अविभाज्य भाग असलेल्या पोलीस नाईक शंकर कळसाने यांना दुु:खा सोबत कर्तव्याला पुर्ण निष्ठेने सलामी देत, या बीड पोलीस दलाच्या अविभाज्य भागास ईश्वराच्या स्वाधीन करत आहे. त्यांना शांती लाभो, ईश्वर त्यांना त्यांच्या जवळ ठेवो “. अशा शोकाकूल भावना व्यक्त केल्या.
          यावेळी बीड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उप अधिक्षक (गृह), पोलीस उप अधिक्षक बीड शहर तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयातील  सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी हजर होते.
शेअर करा
Exit mobile version