केज दि.२४ – जून june monsoon महिना संपत आला तरी वरून rain राजाने डोळे वटारलेले होते. शेतकरी चातकाप्रमाणे पेरणीसाठी पावसाची वाट बघत बसलेला होता. आणि थोड्याशा विलंबाने होईना केज तालुक्यामध्ये वरून राजाने हजेरी लावली. Rain poured in kaij taluka
शनिवारी सायंकाळी केज तालुक्यातील माळेगाव, साळेगाव परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली. आणि पहिलाच पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. पेरणीसाठी शेतकरी मागच्या काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. अखेर आज पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पहिल्याच पावसाने पेरण्या सुरू होणार नसल्या तरी सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनासह समस्त नागरिक सुखावले आहेत.