Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील 23 रुग्ण बरे तर उपचाराखाली 27

केज दि.5 – केज तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या जरी वाढू लागली असली तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.
       आजपर्यंत तालुक्यात ग्रामीण भागातील 29 तर शहरातील 24 असे एकूण 53 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या 27 रुग्ण उपचाराखाली आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आज (बुधवार दि.5) सकाळी 42 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली. आज रात्री उशिरापर्यंत 42 रुग्णांचे रिपोर्ट्स येतील.
शेअर करा
Exit mobile version