मुंबई दि.२९ – शिंदे-फडणवीस सरकारनं सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आणखी एका निर्णयाची भर पडली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम वाढवण्यात आली असून या योजनेचा लाभ आता सरसकट सर्वांना मिळणार आहे.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
Maharashtra Cabinet Decisions
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत २ लाख रुपयांची मदत दिली जात असे. या रकमेत आणखी ३ लाखांची वाढ करून ती ५ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर या योजनेचा लाभ आता राज्यातील सर्वांना मिळणार आहे. आतापर्यंत केवळ पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळत होता. आता ही अट देखील काढून टाकण्यात आली आहे
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही माहिती दिली. राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.