Site icon सक्रिय न्यूज

गंगा माऊली शुगरचा मिल रोलर पूजन कार्यक्रम….!

केज दि १ – शहरालगत असलेला गंगा माऊली शुगर कारखान्याचे मिल रोलर पूजन युवा नेते आदित्य पाटील, व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, गंगा माऊली शुगरचे संचालक प्रवीण मोरे,  संचालक अविनाश मोरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे,काँग्रेसचे युवा नेते पशुपतीनाथ दांगट, श्री. कुलकर्णी, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. आय. मुजावर, मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक, चिफ केमिस्ट श्री सरवदे आदींच्या हस्ते रोलर पूजन झाले. पुढील हंगाम गाळपासाठी पूजन कार्यक्रम घेऊन सुरुवात करण्यात आली.
                     पुढील हंगामात साखर कारखाना सात लाख मेट्रिक टन गाळप चा टप्पा पूर्ण करेल असे मत आदित्य पाटील यांनी बोलतांना व्यक्त केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास आणि हमीभाव याबाबाबत आम्ही शब्दबद्ध आहोत. कॅपिसिटी वाढवण्यासाठी गतीने प्रयत्न सुरू आहेत असे मत हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले. रोलर पूजन कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version