केज दि.६ – देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधून शेजारी दाम्पत्याने घरात घुसून कपाटातील ८१ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना केवड ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. An incident of theft occurred at Kej village where a burglary took place at home and cash amounting to 81,000 rupees was stolen. A complaint of theft has been registered in this regard.
केवड ( ता. केज ) येथील ज्ञानेश्वरी प्रवीण जाधव या पतीसह ४ जुलै रोजी १०.३० वाजता देवदर्शनासाठी उत्तरेश्वर पिंप्री येथे गेल्या होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे जिन्यातील दरवाज्यास कुलूप लावले नव्हते. घरी कोणी नसल्याची संधी शेजारी कल्याण गोवर्धन जाधव व अल्का कल्याण जाधव या दाम्पत्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे लांब गंठण, १५ हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, ७ हजार रुपयांची एक सोन्याची अंगठी, बदाम, काड्या, ६ हजाराचे चांदीचे वाळे, चौन, साखळी ग्लास, वाटी, चांदीच्या बांगड्या, चांदीचा करंडा असे एकूण ८१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करीत ज्ञानेश्वरी जाधव यांनी तक्रार दिल्यावरून कल्याण जाधव व अल्का जाधव या दाम्पत्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बालासाहेब बांगर पुढील तपास करताहेत.