Site icon सक्रिय न्यूज

शिवसेना (ठाकरे गटाचे) बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे पदमुक्त…..!

शिवसेना (ठाकरे गटाचे) बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे पदमुक्त…..!

केज दि.८ – मागच्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या केज तालुका प्रमुख पदावर असलेले रत्नाकर शिंदे हे मागच्या काही महिन्यांपूर्वी जिल्हाप्रमुख झाले होते. रत्नाकर शिंदे जिल्हाप्रमुख व्हावेत म्हणून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाजू लावून धरली होती. आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही वादंग ही निर्माण झालेले होते. मात्र काही महिन्यातच रत्नाकर शिंदे यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

                       रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार करण्यात येत असल्याचे पत्र खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्ध केले आहे. रत्नाकर शिंदे यांना तडकाफडकी पदममुक्त का करण्यात आले याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
शेअर करा
Exit mobile version