Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

केज दि.५ – एका अल्पवयीन मुलीला गावातील तरुणाने दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील बोरगाव ( बु. ) येथे ५ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी केज पोलिसात तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 
        बोरगाव ( बु. ) येथील ३४ वर्षीय महिलेच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले असून ४ ऑगस्ट रोजी रात्री या महिलेसह तिचा मुलगा व अल्पवयीन मुलगी हे तिघे झोपले होते. ५ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घराजवळ दुचाकीचा आवाज ऐक आल्याने ही महिला झोपेतून जागी झाली. घरात झोपलेल्या ठिकाणी मुलगी दिसून न आल्याने बाहेर येऊन पाहिले असता गावातील किशोर नवनाथ आरकडे हा तरुण त्यांच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेताना पाहिले. तिने मोठ्याने आवाज दिला, मात्र न थांबता ते निघून गेले. मुलीने जाताना एक ड्रेस आणि आईचा मोबाईल नेला.
    दरम्यान, आपल्या मुलीला किशोर आरकडे हा नेहमी फोन करत होता. मुलीला त्याच्यासोबत बोलत जाऊ नको असे अनेक वेळा समजावून आणि रागावून ही सांगितले होते. किशोर आरकडे यानेच आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सदर महिलेने दिल्यावरून केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version