बीड दि.९ – एका वीस वर्षीय तरूणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शुभम बाळासाहेब जगताप (वय २०), असे तरुणाचे नाव आहे. अंधापुरी गावात ही घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासुन शेतीचे वाद चुलत्या सोबत चालु होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून शुभम ने स्वतःच्या मोबाईल वर स्वतः चा फोटो टाकून त्यावर भावपुर्ण श्रध्दांजली लिहून आत्महत्या केली असल्याचे शुभम चे मामा शिवाजी घरत यांनी म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेकनुर कुटीर रुग्णालयात पाठवला आहे. शुभम च्या आत्महत्येचा कुटुंबीय आणि मित्र परिवाराला धक्का बसला असून पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.