Site icon सक्रिय न्यूज

भारतीय बौद्ध महासभा तालुका केजच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर….!

केज दि.१४ – भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा केजच्या वतीने (दि.१६) रविवार रोजी वेळूवन बुद्ध विहार भीमनगर केज येथे स.११ ते सायं.७ या वेळेत एकदिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
                                सदरील शिबीर अशोक केदारे (केंद्रीय कार्यालयीन सचिव),बी.बी.धन्वे
(जिल्हाध्यक्ष बीड पुर्व), व्हि.एन.निसर्गंध (विभागीय सचिव) यांच्या मार्गदर्नाखाली संपन्न होणार आहे. या महत्वपूर्ण शिबीरात पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज व इतर महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन होणार आहे तरी तालुका व शहरातील सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष नंदकुमार मस्के, सरचिटणीस बालासाहेब जोगदंड, तालुका कोषाध्यक्ष बळीराम सोनवणे, शहर अध्यक्ष डॉ. प्रभाकर ठोके, शहर सरचिटणीस जयपाल मस्के, शहर कोषाध्यक्ष शिवकुमार मस्के यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version