Site icon सक्रिय न्यूज

केज धारूर रोडवर अपघात, एक ठार एक जखमी….!

केज दि.१५ – शहरापासून पासून अवघ्या  तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या केज – धारूर रोडवरील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या समोर जीप आणि मोटरसायकलचा अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी आहे.

शनिवारी दुपारी तालुक्यातील टाकळी येथील रामेश्वर सदाशिव घुले हे धारूर कडून केजकडे येत असताना साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या समोर त्यांच्या दुचाकीचा आणि बोलेरो गाडीचा अपघात झाला. यामध्ये रामेश्वर घुले हे मृत्यू पावले असून त्यांच्याबरोबर असलेले अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. Accident on kaij Dharur road, 37 years old person died

                 सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सदरील जखमींना दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र रामेश्वर सदाशिव घुले यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यामध्ये एकाला जीव गमावा लागला आहे.
शेअर करा
Exit mobile version