Site icon सक्रिय न्यूज

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून….!

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून….!

बीड दि.२० – एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात मध्यरात्री लोखंडी रॉड मारत खून केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुणाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

                शहरातील अंकुश नगर भागात राहणाऱ्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधिर सुरेश कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने आज मध्यराञी जन्मदात्या बापाचा सुरेश काशीनाथ कुलकर्णी (वय-70) यांचा खुन केला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी सुरेखा कलकर्णी (वय-62) यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी (वय-38) यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांची टिम करत आहे.

शेअर करा
Exit mobile version