Site icon सक्रिय न्यूज

मंदिरातून चांदीच्या मुखवट्यांसह घोडे गेले चोरीला….! 

जळगाव जामोद दि. 20 –  पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपळगाव काळे येथील पुरातन अशा बिरोबा महाराज मंदिरातून अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिरातून चांदीच्या मुखवट्यांसह चांदीचे घोडे चोरून नेण्याची घटना आज दिनांक 18 जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
                 पिंपळगाव काळे येथील संपूर्ण पंचक्रोशी प्रसिद्ध असलेले पुरातन बिरोबा मंदिर असून या ठिकाणी विविध उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. आज सकाळी बिरोबा संस्थांचे अध्यक्ष हरिदास किसन वाघमारे हे दर्शनासाठी मंदिरात गेले असता त्यांना देवाचे 2 चांदीचे मुखवटे व 5 चांदीचे घोडे त्या ठिकाणी दिसले नाहीत.
            त्यामुळे चोरी झाल्याचे गावात माहिती होताच नागरिकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मंदिराचे अध्यक्ष हरिदास वाघमारे यांच्यासह गोपाळ तायडे, बंटी कळस्कार, सचिन जाधव व गावातील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. मंदिरातून अज्ञात चोरट्याने 2 चांदीचे मुखवटे किंमत अंदाजे 50 हजार रूपये, व चांदीचे पाच घोडे वजन अंदाजे 500 ग्रॅम किंमत अंदाजे 20 हजार रुपये असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
                घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी येथील नागरिकांनी चोराचा तपास लवकर करण्यात यावा व त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
            दरम्यान, घटनेची संस्थानचे अध्यक्ष हरिदास वाघमारे यांनी तक्रार दिल्याने अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे हे करीत आहे.
शेअर करा
Exit mobile version