Site icon सक्रिय न्यूज

मारहाणीत वडिलांचा मृत्यू, तीन मुलांवर गुन्हा….!

मारहाणीत वडिलांचा मृत्यू, तीन मुलांवर गुन्हा….!
केज दि.२२ – विधवा महिलेशी वडिलांनी अनैतिक संबंध ठेवल्यावरून मुलांनी वडीलांना प्लस्टिक पाईपने मारहाण केली होती. त्यांनतर अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या घरासमोर जखमी वडिलांना टाकून गेल्यानंतर उपचारासाठी त्या महिलेने नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची घटना केज शहरात घडली असून संबंध असलेल्या  महिलेच्या तक्रारीवरून मयत व्यक्तीच्या तिन्ही मुलाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     केज शहरातील अहिल्यादेवी नगर येथील मनोहर गायके ( वय ४५ ) यांचे एका विधवा महिलेसोबत दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्यावरून १९ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान मनोहर गायके यास त्यांची पत्नी पार्वती हिने शिवीगाळ केली. तर त्याची मुले कृष्णा गायके, ईश्वर गायके व शंकर गायके या तिघांनी बोअरच्या मोटारीच्या प्लास्टीक पाईपने त्यास बेदम मारहाण केली. हा प्रकार संबंध असलेल्या महिलेने बघितला. त्याला मारहाणीनंतर त्यांनी त्या महिलेच्या दारात टाकुन ते निघुन गेले. त्या महिलेने मनोहरला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्याने त्या महिलेने रात्री ठाण्यात येऊन तिला मनोहरच्या पत्नी व मुलांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार दिली होती. ती परत घरी गेल्यावर मनोहर हा तिच्या दारात नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या मनोहर यास झोपलेल्या अवस्थेत पत्नी व त्याची मुलांनी रिक्षातून कोठे तरी नेले. दुपारी ३ वा. मनोहरच्या पत्नीने त्या महिलेस घरी बोलावून घेत तो उठत व जेवण केले नसल्याचे सांगून त्याला डॉ. वायबसे यांचे दवाखान्यात दाखवून आणल्याचे सांगत यापुढे त्याचे काय करायचे ते तु बघ. तुझे त्याच्याशी अनैतिक संबंध होते. असे म्हणाल्यावरून ती महिला तिच्या घरी निघुन आली. त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास मनोहर यास त्याच्या तिन्ही मुलांनी तिच्या दारात आणून टाकले. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास मनोहर गायके याच्या मोठा मुलगा कृष्णा गायके याने त्या महिलेस डॉक्टरने दिलेल्या गोळ्या खाऊ घालण्यास सांगितले. मात्र तिने माझा काय संबंधं नाही. तु तुझे बघ. असे म्हणाली असता कृष्णा याने मनोहर याला डॉक्टरने दिलेल्या गोळया खाऊ घालुन तो निघुन गेला. थोड्या वेळाने मनोहर कसा तरी करु लागल्याने तिने त्याच्या घरच्या लोकांना माहिती दिली. त्यांनी दखल न घेतल्याने शेवटी तिने खाजगी गाडीतून उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला अंबाजोगाईला नेण्यास सांगितल्यावरून त्याला २१ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
                अशी तक्रार त्या महिलेने दिल्यावरून कृष्णा मनोहर गायके, शंकर मनोहर गायके, ईश्वर मनोहर गायके या तिन्ही मुलाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास फौजदार आनंद शिंदे करीत असून तिन्ही मुलांना अटक केली आहे.
शेअर करा
Exit mobile version