Site icon सक्रिय न्यूज

या महिन्याचे मानकरी ठरले आंबाड कुटुंबीय….!

केज दि.26 – मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्स च्या लकी ड्रॉ योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानुसार जुलै महिन्यातील ड्रॉ चे विजेते ठरले आहेत लाडेगाव येथील आंबाड कुटुंबीय. त्यांना दहा हजारांची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
                  हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दागिने खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांची सोडत दर महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 जून ते 25 जुलै 2023 दरम्यान जमा झालेल्या कुपनांची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पैठणी साडीचे मानकरी ठरले लाडेगाव येथील दिलीप बब्रुवान आंबाड कुटुंबीय. सदरील भेट ज्वेलर्स चे संचालक रुद्रवार व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
            दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांची पसंती वाढत आहे.सदरील ड्रॉ योजना ही पुढेही चालू राहणार असून जास्तीतजास्त ग्राहकांनी संधीचा लाभ घेण्याचे व नव्यानेच सुरू केलेल्या दागिन्यांच्या भव्य दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Advt)
शेअर करा
Exit mobile version