Site icon सक्रिय न्यूज

शेतकऱ्याचे हातपाय बांधून अडीच ते तीन लाखांची चोरी…..!

केज दि.२६ – अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याचे हातपाय बांधून जीवे मारण्याची धमकी देत अडीच ते तीन लाख रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना केज तालुक्यातील दीपेवडगाव येथे घडली.
      दीपेवडगाव येथील शेतकरी बशीर पापाभाई शेख यांची केज – अंबाजोगाई रस्त्यालगत शेती असून ते मागील सात ते आठ वर्षांपासून शेतात शेळीपालन व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडे लहान – मोठ्या २७ शेळ्या होत्या. २४ जुलै रोजी त्यांनी दिवसभर शेळ्या चारून गोठ्यात बांधल्या होत्या. रात्री १० वाजेच्या सुमारास बशीर शेख हे जेवण करून झोपले. रात्री ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान अनोळखी तीन इसम गोठ्यात आले. त्यांनी बशीर शेख यांचे हातपाय बांधून अडीच ते तीन लाख रूपये किमंतीच्या २७ शेळ्या चोरून नेल्या. त्यानंतर त्यांनी मुलाला फोन करून बोलावून घेतले. तो पर्यंत चोरटे पसार झाले. बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शेअर करा
Exit mobile version