बीड दि.२९ – वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली असून तीन महिलांची सुटका केली असून वेश्या व्यवसाय चालकाच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत चौसाळा येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दुसऱ्या मजल्यावर दशरत तानाजी थोरात रा. चौसाळा ता. जि. बीड यांचे मालकीचे जाणकी हॉटेल आहे. यामध्ये गणेश मच्छीद्र लहाणे रा. महाकाळ ता. अंबड जि.जालना, दिनेश प्रल्हाद सोनवने रा. चौसाळा ता. जि. बीड, दशरत तानाजी थोरात रा. चौसाळा ता. जि. बीड हे स्वतःच्या फायद्यासाठी सदर हॉटेलमध्ये पैशाचे अमिष दाखवून महिलांना हॉटेलमध्ये ठेवून वेश्या व्यवसाय चालवत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी एक डमी ग्राहक पाठवून खात्री केली आणि सदरील वेश्या व्यवसायावर धाड टाकली. तिथून तीन महिलांची पोलिसांनी सुटका करत, वेश्या व्यवसाय चालकावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. तर पुढील तपास एपीआय विलास हजारे हे करत आहेत.