Site icon सक्रिय न्यूज

शिक्षक प्रेरणा परिक्षेवर केज तालुक्यात बहिष्कार कायम…..!

केज दि.३० – तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक प्रेरणा परिक्षेवर केज तालुक्यात असलेला शिक्षकांचा बहिष्कार कायम राहिला.मात्र शहरातील पाच केंद्रांवर मिळून केवळ सात शिक्षक परीक्षा देत आहेत.
              शिक्षकांचे विविध विषयातील ज्ञान पडताळणीसाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पहिली ते दहावी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार तयारीही करण्यात आली आणि यामध्ये रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी आणि गणित या सहा विषयांची एकूण 300 गुणांची परीक्षा आयोजित केली. मात्र सुरुवातीपासूनच या परीक्षेला शिक्षक आणि शिक्षक संघटनाकडून तीव्र विरोध सुरू होता. परंतु दि.30 जुलै आणि 31 जुलै रोजी 10 ते 2 यावेळेत परीक्षा आयोजित करण्यात आली आणि सर्व तयारीही करण्यात आली. केज तालुक्यातील 1140 शिक्षकांसाठी शहरातील वसंत विद्यालय, सरस्वती कन्या प्रश्नाला, रामराव पाटील विद्यालय आणि साने गुरुजी निवासी विद्यालय आणि तापडिया पब्लिक स्कुल हे पाच केंद्रे ठरवण्यात आली. परंतु सुरुवातीपासून असलेला विरोध कायम राहिला आणि जवळ जवळ सर्वच शिक्षकांनी या परिक्षेवर बहिष्कार कायम ठेवला.
                दरम्यान, बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांची संख्या जरी मोठी असली तरी 1140 पैकी सरस्वती कन्या प्रशालेत 4, तापडिया पब्लिक स्कुलमध्ये 2 तर वसंत विद्यालयात 1 असे एकूण 7 शिक्षक परीक्षा देत आहेत.
शेअर करा
Exit mobile version