केज दि.३१ – एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील एका गावातील १५ वर्ष १ महिना १३ दिवस वयाच्या मुलीस चार महिण्यापूर्वी उमेश आश्रुबा केदार ( रा. नामेवाडी ता. केज ) याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र ती अल्पवयीन असल्याने लग्न करून देण्यास नकार दिल्यापासून तो तिची छेड काढणे, पळवून नेण्याची धमकी देत होता. २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता तिचे वडील व आई हे दोघे शेतात कामास गेले. तर घर ही अल्पवयीन मुलगी एकटीच होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास उमेश केदार याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिघे अपहरण केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिचे आई – वडील घरी आले. त्यांना मुलगी घरी दिसून न आल्याने अगोदर त्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा तपास लागला नाही. शेवटी उमेश याच्या घरी जाऊन त्याची माहिती घेतली असता तो घरी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने या मुलीचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उमेश केदार याच्याविरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आनंद शिंदे तपास करताहेत.