Site icon सक्रिय न्यूज

प्रसिद्ध कला दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड….!

मुंबई दि.2 – नितीन चंद्रकांत देसाई हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभे राहतात भव्यदिव्य सेट्स… एन डी स्टुडिओ… पण याच एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अवघी सिनेसृष्टी हळहळली आहे.
                नितीन चंद्रकांत देसाई यांचं सिनेसृष्टीसाठी मोठं योगदान दिलं. बॉलिवूडमधील अनेक ऐतिहासिक आणि बिगबजेट सिनेमांसाठी त्यांना कला दिग्दर्शन केलं आहे.
1989 साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. परिंदा या सिनेमासाठी पहिल्यांदा त्यांनी कला दिग्दर्शन केलं. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट सिनेमांसाठी सेट्सची निर्मिती केली आहे. हम दिल दे चुके सनम, मिशन काश्मीर, राजू चाचा, देवदास, लगान, बाजीराव मस्तानी या सिनेमांसाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.
                  सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सिनेदिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. संजय लीला भन्साळी, विधु विनोद चोपडा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमांसाठी नितीन चंद्रकांत देसाई यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कर्जतमध्ये असलेल्या एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांचा मृतदेह आढळून आला. नितीन देसाई रात्री झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले. त्यानंतर ते बाहेर आलेच नाहीत. सकाळी खोलीत पाहिलं असता त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
           दरम्यान, पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. तेव्हा दादरच्या शिवाजी पार्कवर झाला होता. तेव्हा नरेंद्र मोदी यांना कमळातून कार्यकर्त्यांसमोर आणलं गेलं होतं. ही संकल्पना नितीन देसाई यांचीच होती. ती कल्पना मोदींना प्रचंड आवडली. पुढे पंतप्रधान झाल्यानंतर वाराणसीमधल्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये देसाईंना त्यांनी काम दिलं.
शेअर करा
Exit mobile version