Site icon सक्रिय न्यूज

अखेर खासदार रजनीताई पाटील यांचे निलंबन मागे….!

केज दि. ७ – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे निलंबन रद्द ठरवत न्यायालयाने त्यांना खासदारकी कायम ठेवली. त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी राज्यसभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांचे राज्यसभेतून केलेले निलंबन रद्द ठरवले आहे.
                   राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील  राज्यसभेत नेहमी आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न मांडत असतात. मागील कालावधीमध्ये वारंवार सरकारला धारेवर धरल्याने शब्दावली चित्रीकरण केल्याने निलंबन करण्यात आले होते. उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी निलंबन रद्द ठरवले आहे. त्या जनसमान्यांचा आवाज राज्यसभेमध्ये सातत्याने पोहोचवणार आहेत. गेल्या साडेपाच महिन्यापासून त्या राज्यसभेतून निलंबित होत्या. मात्र निलंबन रद्द ठरवल्याने त्या आता पुन्हा राज्यसभा सभागृहात कायम राहणार आहेत. याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे.
          दरम्यान, जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी राज्यसभेत कायम आक्रमकपणे आवाज उठवत राहणार असल्याची प्रतिक्रिया रजनीताई पाटील यांनी दिली.
शेअर करा
Exit mobile version