Site icon सक्रिय न्यूज

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेची आढावा बैठक….!

केज दि. ७ – शिवसेनेची आढावा बैठक संभाजीनगर येथे खा. श्रीकांत शिंदे  , आ. संजय शिरसाट, मा. खा. प्रदीप जयस्वाल, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, पक्ष निरीक्षक राजेश कदम  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक संभाजीनगर येथे संपन्न झाली.
            यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी बीड जिल्ह्यात व केज मतदार संघात विकास निधी कमी पडु देणार नाही असे सांगितले. तर जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांनी सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे  यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात व केज मतदार संघात विकासाची गंगा खेचून आणणार अशी ग्वाही दिली. यावेळी  बीड जिल्ह्यातून शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
             शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे,  चंद्रकांत नवले, योगेश नवले, केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, केज तालुकाप्रमुख पंजाबराव देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ संतोष बुडूक, उपतालुकाप्रमुख महेंद्र चाटे, युवासेना तालुकाप्रमुख सुग्रीव सक्राते, युवासेना उपतालुकाप्रमुख शिवाजी गायकवाड, युवासेना केज शहर प्रमुख सय्यद जमीर आदींची उपस्थिती होती. दरम्यान,  केज विधानसभा मतदारसंघात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम काम करत राहणार असल्याचे दादासाहेब ससाने यांनी मत व्यक्त केले.
शेअर करा
Exit mobile version