Site icon सक्रिय न्यूज

जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन….!

मुंबई दि.९ – ज्येष्ठ लेखक, विचारवंत, मराठी ब्लॉगर आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी ते येत असताना सकाळी त्यांना हृदयविकाराच्या झटका बसला. यानंतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.

            हरी नरके यांनी 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मावळली.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version