Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका, लाचखोर डॉक्टर कार्यमुक्त….!

जळगाव जामोद दि.११ – येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील वेरुळकर हे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या वृद्ध लाभार्थ्यां कडून वयाच्या दाखल्यासाठी पाचशे ते हजार रुपये घेत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिनांक 27 जून रोजी केली होती. त्या तक्रारीवर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठित करून त्यांना कार्यामुक्त केले आहे.
                             डॉ. स्वप्नील वेरुळकर यांनी केलेल्या या गैरप्रकाराची ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे येऊन या त्रीसदस्यीय समितीने डॉक्टर स्वप्नील वेरुळकर हे दोषी असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिल्याने दिनांक 8 ऑगस्ट रोजी संबंधित डॉक्टर स्वप्निल वेरूळकर यांना अध्यक्ष जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी यांनी दोषी डॉक्टर वेरुळकर यांना  सेवामुक्त केले आहे. संबंधित डॉक्टर वेरुळकर हे सेवामुक्त केल्याने जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांमध्ये खळबळ माजली आहे.
शेअर करा
Exit mobile version