केज दि.११ – तालुक्यातील कानडी माळी येथे शनिवार दि १२ रोजी आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते ३१ लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमासाठी यावेळी भाजपचे रमेश आडसकर, नंदकिशोर मुंदडा यांच्यासह रणजीतसिंह पाटील, अंकुश इंगळे यांची उपस्थिती असणार आहे. शनिवार दि. १२ आॕगष्ट रोजी सकाळी ९. ३० वा मतदारसंघ च्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते कानडी माळी येथे ३१ लाख रुपयाची विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात येणार आहे. यामधे संत सावता महाराज मंदिर सभामंडप , अंगणवाडी क्र २ चे बांधकाम, सिमेंट रस्ते, आरोग्य उपकेंदाची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे.तर यावेळी गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आरओ प्लांट चे उदघाटनही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी चेअरमन बाजीराव रामभाऊ राऊत हे असणार आहेत. सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अशोक राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.