Site icon सक्रिय न्यूज

केज येथे इंग्रजी व्याकरण पुस्तकाचे प्रकाशन…..!

केज दि.१४ – विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सोपी वाटावी आणि त्यांना अतिशय सहज इंग्रजी विषयाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक प्रा.श्रीराम सारूक यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन आमदार नमिता मुंदडांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
                        प्रा.श्रीराम सारूक यांनी The Only Grammar Book You Need नावाचे इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेत लिहिले आहे. सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक उपयुक्त ठरणार असून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.सदरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सकाळी दहा वाजता ज्ञानज्योती क्लासेस मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सक्सेस अकॅडमी चे संचालक श्री.चोभारे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नमिता मुंदडा ह्या होत्या.यावेळी नमिता मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंग्रजी विषयाचे महत्त्व पटवून दिले.तसेच शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शना बरोबर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करण्याचा सल्लाही दिला.
             यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, पत्रकार डी. डी. बनसोडे, गौतम बचूटे यांच्यासह महादेव सूर्यवंशी, सुनील घोळवे, डॉ.वसुदेव नेहरकर, शरद इंगळे, भगवान केदार यांचीही उपस्थिती होती.
               सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष राऊत यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.ज्ञानेश कलढोने, आभार प्रा.अविनाश घुले यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.
शेअर करा
Exit mobile version