Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये पत्रकार एकवटले, संरक्षण कायद्याची केली होळी…!

केज दि.१७ – पत्रकारा वरील वाढते हल्ले आणि त्या संदर्भात केलेल्या कायद्या अंतर्गत होत नसलेली कारवाई याचा निषेध व्यक्त करीत केज येथे मराठी पत्रकार परिषद आणि विविध पत्रकार संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची होळी केली.
                 मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षाच्या लढ्या नंतर एस. एम. देशमुख यांच्या अथक प्रयत्नामुळे सरकारला पत्रकार हल्ला विरोधी कायदा करावा लागला. परंतु त्या नंतरही पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. मागील काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील याच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. परंतु शासकीय यंत्रणा पत्रकार हल्लविरोधी कायद्याने गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात आणि राजकीय व कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी ही मंडळी हल्लेखोरांना संरक्षण देतात. त्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दि. १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात या कुचकामी कायद्याची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.  त्यानुसार दि. १७ ऑगस्ट रोजी केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रत जाळून निषेध व्यक्त केला.
               या आंदोलनात विधिमंडळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम बचुटे, विजयराज आरकडे, अशोक सोनवणे, धनंजय कुलकर्णी, अभय कुलकर्णी, दत्तात्रय हंडीबाग, दशरथ चवरे, विनोद शिंदे, डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष रामदास तपसे, सतीश केजकर, अजय भांगे, बाळासाहेब जाधव, महादेव काळे, धनंजय घोळवे, रमेश इतापे, नंदकुमार मोरे, प्रकाश मुंडे, महादेव गायकवाड, सुहास चिद्रवार, रमेश गुळभिले, मुबशीर खतीब, जय जोगदंड, अक्षय वरपे, दत्तात्रय मुजमुले, अजीम इनामदार यांच्यासह केज तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी पत्रकार एकजुटीचा आणि हल्लेखोरांवर कठोर करवाईच्या मागण्यांची प्रचंड घोषणाबाजी केली.
              दरम्यान  छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची होळी केल्या नंतर तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार आशा वाघ आणि पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना निवेदन देण्यात आले.
शेअर करा
Exit mobile version