Site icon सक्रिय न्यूज

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत महिलेचा खून…..?

बीड दि.२२ –  तालुक्यातील धावड्याचीवाडी येथे एका महिलेचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२१) सकाळी समोर आली.सदर महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

मंगल गुंडीराम भोसले (वय-४५) असे मयत महिलेचे नाव आहे.तिचा पती गुंडीराम भोसलेने चारित्र्यावर संशय घेत असल्याची चर्चा आहे.नेकनूर पोलीस याप्रकरणाचा तपास करीत असून घटनास्थळी पंकज कुमावत यांनी भेट दिली होती.दरम्यान आरोपी पती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान, याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार मंगल आणि गुंडीराममध्ये पैशाच्या कारणावरून ही सातत्याने वाद होत असे.सातत्याने होणाऱ्या वादामुळे पतीपत्नीत मोठा दुरावा निर्माण झाला होता. अद्याप पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नसून गुंडीरामला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून नेमका कुणी केला हे पोलीस तपासत स्पष्ट होईल.

शेअर करा
Exit mobile version