HSC, SSC Board exam pattern will changed
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नवीन बदलानुसार, दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. हा बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठी करण्यात येणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून upcoming Academic year बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. हा बदल लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 साठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तके येणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला जात आहे. तसेच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन भाषा सक्तीच्या असणार आहेत. त्यातील एक भाषा स्थानिक भारतीय भाषा असणार आहे.
दरम्यान, या बदलामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचा ताण येऊ नये, या परीक्षा त्याच्यासाठी सुलभ असाव्या, त्यांना चांगले गुण मिळविण्याची संधी मिळावी, या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.