पुणे दि.१ – महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्याच्या स्थापने नंतर प्रकाशझोतात आले. त्यात स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड प्रामुख्याने गणाला जातो.या किल्ले वर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी स्थळ आहे. शिवकालीन जगदीशश्वर मंदिर आहे. राजदरबार इतर बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी गडावर आहेत. हे वैभव लोकांनी पाहून त्याचा अनुभव घ्यावा म्हणून सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था अनेक गडकिल्ले च्या पाहणी मोहिमा अभ्यास मोहिमा घेत असते. आणि अशीच एक रायगड दर्शन मोहीमेचे नियोजन करून किल्ले रायगडावर शेकडो मुले मुली यांनी एकत्रित येऊन ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम केले आहे.
किल्ले रायगड वरील माहिती सर्वाना सगळ्यांना सविस्तर मिळावी म्हणून सह्याद्रीचे भुते कडून रायगड वरील अभ्यासक, गडदुर्गशतकवीर किताब मिळवणारे राज तपसे यांना प्रमुख उपस्थिती म्हणून बोलावण्यात आले. त्यांनी रायगडाची सविस्तर माहिती सर्व सदस्यांना दिली. आणि एक एक वास्तू चे बारीक बारीक माहिती देऊन शिवकार्यस हातभार लावावा म्हणून नवं युवकांना आकर्षित केले. याच मोहिमे दरम्यान एकुण 150 वेळा रायगड सर केला आणि दोन वर्षांपासून विना चप्पल चा प्रण ही त्यांनी जगदीश्वर आणि महाराजांच्या समाधी स्थळी सोडला. सह्याद्रीचे भुते मार्फत गडावर पोवाडा गायन आणि शिवकार्यस प्रेरणादायी असे उपक्रम राबवण्यात आले. गडाचे महत्व सांगितले. महाराष्ट्र मधील वैभव टिकवायचं असेल तर पहिले ह्या महाराष्ट्र मधील गडकिल्ले टिकवले पाहीजे असे उदगार दुर्गशतकवीर श्री राजदादा तपसे यांच्या कडून काढण्यात आले.
सह्याद्रीचे भुते संस्था कडून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जाते.प्रत्येक महिन्यात एक गडदर्शन मोहीम काढण्यात येते.सामाजिक आणि शिवकार्य मधून अनेक मुलींना स्वावलंबी होण्याचे व निर्भीड होऊन जगण्याचे प्रशिक्षण संस्था मार्फत अनेक भागात देण्यात येते. रायगड दर्शन दरम्यान असेच मुलींना निर्भीड होऊन पुढे येण्याचे आव्हान संस्था कडून करण्यात आले.सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था कडून संस्था चे अध्यक्ष श्री वैभव टकले, सचिव मिताली कदम,मोहीम प्रमुख श्री शिवाजी ताठे, राहुल सोमासे, राजश्री पाटोळे, पूर्वा ताई काळे, वैशाली शिंदे, पुजा काटे, प्रवीण चव्हाण, रतन आवारे, दिनेश ढगे, शंभु पाटोळे, अनिता देसाई आणि दुर्गशतकवीर, दुर्गअभ्यासक श्री राज दादा तपसे यांची प्रमुख उपस्थिती किल्ले रायगडावर होती.